Ad will apear here
Next
‘ब्रश स्ट्रोक्स’ या समूह चित्रप्रदर्शनाचे आयोजन

पुणे :  एकाच चित्रप्रदर्शनात तब्बल १५ चित्रकारांची कला अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे चित्रकार निलेश पवार यांच्या कलाश्री आर्ट्स या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्रश स्ट्रोक्स’ या चित्रप्रदर्शनाचे. येत्या गुरुवारी, ११ एप्रिल ते रविवार, १४ एप्रिल २०१९ दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील पत्रकारनगर येथील दर्पण आर्ट गॅलरी येथे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजता सहभागी चित्रकारांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर १२ ते १४ एप्रिल २०१९ दरम्यान सकाळी ११ ते सायं सात या वेळेत रसिकांना ही चित्रे बघता येणार आहेत.

प्रत्येक कलाकार हा स्वत:च्या कल्पनाविस्ताराच्या जोरावर व्यक्त होण्याचा प्रयत्न करीत असतो आणि या व्यक्त होण्याला गरज असते ती आवडीची. हीच आवड जोपासत विविध १५ चित्रकार एकत्र येत ‘ब्रश स्ट्रोक्स’ या चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून आपली कला सादर करणार आहेत. 

यामध्ये आरती किर्लोस्कर, करुणा चावला, मंजुश्री भणगे, नेहा जंगले, नीता बक्षी, नितीन भणगे, राजश्री जंगले, शैला मोरे, शुभांगी मांजरेकर, शुभदा रणदिवे, सुहास जंगले, सुनीता कोलते, सुनीता पाटील, सौरभ जंगले आणि निलेश पवार यांची चित्रे पाहण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून रसिक पुणेकरांना मिळणार आहे. या पंधरा चित्रकारांनी विविध विषयांवर काढलेल्या चित्रांचा या प्रदर्शनामध्ये समावेश करण्यात आला आहे.


कार्यक्रमाविषयी : ‘ब्रश स्ट्रोक्स’ चित्र प्रदर्शन
स्थळ : दर्पण आर्ट गॅलरी, पत्रकारनगर, सेनापती बापट मार्ग.
दिवस व वेळ : शुक्रवार,१२ एप्रिल ते रविवार, १४ एप्रिल, सकाळी ११ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZUZBZ
Similar Posts
मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन पुणे : लवंग, मिरी, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जातात; पण अरविंद जोशी यांनी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून चित्रे साकारली आहेत. या अनोख्या चित्रांचे ‘इंटरफ्यूजन’ हे प्रदर्शन सध्या दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे.
४५ प्रसिद्ध चित्रकारांचे पुण्यात एकत्र प्रदर्शन पुणे : सांस्कृतिक वारसा असलेल्या पुण्यनगरीतील निवडक ४५ चित्रकारांची चित्रे प्रथमच एकाच व्यासपीठावर बघायला मिळणार आहेत. ‘व्हीनस आर्ट फेस्ट २०१९’ हे चित्र प्रदर्शन शनिवार, आठ जून ते सोमवार, दहा जूनपर्यंत बालगंधर्व रंगमंदिर येथील बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी
कॉस्मो आर्ट ग्रुपतर्फे ४० चित्रकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन पुणे : येथील कॉस्मो आर्ट ग्रुपतर्फे चाळीस चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन घोले रस्त्यावरील राजा रवि वर्मा आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात ८० पेक्षा जास्त चित्रे ठेवण्यात आली आहेत. मंजूषा सारडा यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. मंगळवारी, २६ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ११ वाजता
रंगभाषेचे वारकरी, बोलती तयांचे हात...! ‘देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे!’... सुधाकर रेमणे यांना भेटल्यानंतर प्रकर्षाने या ओळी आठवतात. जन्मजात कर्णबधिरपणा आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या शारीरिक मर्यादांमुळे त्यांना सामान्य व्यक्तीसारखे आयुष्य जगणे खूप कठीण होते; मात्र हार न मानता त्यांनी चित्रकलेची साधना केली. हुबेहूब व्यक्तिचित्रे ही तर त्यांची खासियतच

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language